Pune Girl Reel :सोशल मीडियावर एक पुण्याच्या मुलीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे, या व्हिडिओमध्ये एक मुलगी इमारतीला लटकताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये एका मुलाने त्या मुलीचा हात पकडला आहे, तर दुसरा मुलगा या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ बनवत आहे.
सोशल मीडियावर व्हायरल रील बनवण्याच्या नादात लोक वेडेपणाचा कहर करत आहेत. नुकताच एक पुण्यातील मुलीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे, जो पाहिल्यानंतर तुम्ही म्हणाल की हा निव्वळ वेडेपणा आहे. व्हिडीओ बनवण्याच्या नादात आजकाल तरूण जीव धोक्यात घालत आहेत. हा व्हिडिओ पुण्यातील असल्याचे सांगितले जात आहे.
पुण्यातील जांभूळ वाडी स्वामी नारायण मंदिराजवळ ही घटना घडली आहे. व्हिडिओमध्ये एक मुलगी आणि इतर दोन तरुण एका उंच इमारतीच्या छतावर चढले आहेत. एकाच्या हातात कॅमेरा तर दुसरा इमारतीच्या गच्चीवर पडून मुलीचा हात धरून होता. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडीओ पाहून लोक आश्चर्य व्यक्त करत आहेत.
हा व्हिडिओ समोर येताच लोकांनी या जीवघेण्या व्हिडीओवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या. या निष्काळजीपणामुळे मुलीला आपला जीव गमवावा लागला असता, असे एका यूजरने म्हटले आहे.
Pune Girl Reel:
🔴 ट्रेंडिंग 👉 गाड्यावर वडापाव विकून मुलीने रोज कमावले इतके रुपये, ऐकूण व्हाल थक्क.