तनुजा आणि शोमू मुखर्जीच्या लग्नाचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे
काजोलची आई बॉलिवूड अभिनेत्री तनुजा ही त्या काळातील एका प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक होती. तनुजा आजही तिच्या साधेपणामुळे ओळखली जाते. त्या काळातील अभिनेत्रींपेक्षा ती पूर्णपणे वेगळी होती आणि त्यामुळेच लोकांना ती खूप आवडायची.
तनुजा तिच्या चित्रपटांसोबतच तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असते. तनुजाने चित्रपट निर्माता शोमू मुखर्जीसोबत लग्न केले होते. तनुजा आणि शोमू मुखर्जी मुस्कुरा दो चित्रपटाच्या सेटवर भेटले दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. तनुजा आणि शोमूचे प्रेम चित्रपटाच्या सेटवर फुलले आणि एक वर्ष डेट केल्यानंतर दोघांनी लग्न केले.
तनुजा आणि शोमू यांच्या लग्नानंतर त्यांना काजोल आणि तनिषा या दोन मुली झाल्या. मात्र काही वर्षांनी तनुजा आणि शोमूमध्ये मतभेद सुरू झाले. त्यानंतर तनुजा आणि शोमूने वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता पण दोघांचा घटस्फोट झाला नाही. तनुजाने काजोल आणि तनिषा दोन्ही मुलींना एकटीने सांभाळले.
सध्या तनुजा आणि शोमू मुखर्जीच्या लग्नाचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
हेही वाचा 👉 अंकिता लोखंडेला ‘पवित्र रिश्ता’ साठी मिळायच फक्त “इतक” मानधन, आज आहे कोट्यवधीच्या संपत्तीची मालकीण.