JNU: बॉलिवूडमध्ये अनेकदा कोणत्या ना कोणत्या गंभीर विषयावर चित्रपट बनवले गेले आहेत. यावेळी जेएनयूवर आधारित एक चित्रपट दाखवण्यात येणार आहे ज्यामध्ये आपल्याला सत्य घटना पाहायला मिळतील ज्याबद्दल फार कमी बोलले जाते. ‘जहांगीर नॅशनल युनिव्हर्सिटी’ हा सिनेमा विद्यार्थ्यांच्या राजकारणाचा पर्दाफाश करणार आहे. उर्वशी रौतेला आणि रवी किशन या कलाकारांना घेऊन हा चित्रपट बनवला गेला आहे.
एकीकडे लोकसभा निवडणुकीची तयारी जोरात सुरू आहे. अशातच, बॉलीवूडमध्येही अशाच एका चित्रपटाची चर्चा चालू आहे, JNU ज्यामध्ये निवडणुकीच्या रंगाची झलक दाखवण्यात आली आहे. ‘जेएनयू’ 5 एप्रिलला प्रदर्शित होत आहे, ज्यामध्ये आपल्याला रोमान्ससोबतच विद्यार्थी राजकारणही पाहायला मिळणार आहे.
सध्या व्हायरल 👉 रणदीप हुड्डाचं मोठ वक्तव्य, आलिया खालच्या दर्जाची अभिनेत्री म्हणून कंगना राणावतने उडवली खिल्ली.
जेएन : जहांगीर नॅशनल युनिव्हर्सिटी’च्या मध्ये रवी किशन, विजय राज, उर्वशी रौतेला आणि पियुष मिश्रा हे प्रमुख कलाकार आहेत. दिल्लीची पार्श्वभूमी लक्षात घेऊन हा सिनेमा बनवण्यात आला आहे. या चित्रपटाचा निवडणुकीशी काहीही संबंध नसल्याचे दिग्दर्शक विनय शर्मा यांनी सांगितले. विनय शर्मा म्हणाले, ‘हा चित्रपट खऱ्या घटनांवर आधारित एक मनोरंजन चित्रपट आहे, ज्यामध्ये कॉमेडी, रोमान्स, गाणी आणि विद्यार्थी राजकारण दाखवले गेले आहे. हा सिनेमा बनवायला दोन ते अडीच वर्षे लागली.
विनय शर्मा यांनी सांगितले कि सेन्सॉर बोर्डमुळे JNU चित्रपटचे नाव बदलावे लागले. 80 हून अधिक कलाकारांना घेऊन हा चित्रपट बनवण्यात आला आहे.
व्हायरल 👉 तापसी पन्नूच्या लग्नाचा व्हिडिओ व्हायरल, नाचत सुटली नवऱ्याकडे.