बिग बॉस ओटीटी सीजन 3 : दिल्लीची प्रसिद्ध ‘वडा पाव गर्ल’ चंद्रिका दीक्षित ही अनिल कपूर होस्ट करत असलेल्या रिॲलिटी शोच्या तिसऱ्या सीझनची स्पर्धक आहे. नुकतेच चंद्रिका दीक्षित ने दिल्लीच्या रस्त्यावर वडा पाव विकून किती रुपयांची कमाई केली आहे याचा खुलासा केला आहे.
वडा पाव गर्ल चंद्रिका दीक्षित एका दिवसात किती रुपये कमावते? पिंकविलाच्या अहवालानुसार, शुक्रवारी रिॲलिटी शोच्या प्रीमियर दरम्यान बिग बॉस ओटीटी 3 स्पर्धकांपैकी एक असणाऱ्या चंद्रिका दीक्षित ने तिच्या कमाई बद्दल खुलासा केला.
बिग बॉस OTT 3 च्या घरामध्ये चंद्रिकाने वडा पाव विकून दररोज ₹ 40,000 कमावल्याचे सांगितले, ज्यामुळे तिच्या सह-स्पर्धकांना मोठे आश्चर्य वाटले, अहवालानुसार. दिल्लीतील रस्त्यावर वडा पाव विकून रातोरात प्रसिद्धी मिळवणारी चंद्रिका नुकतीच तिच्या कुटुंबासह शोमध्ये भाग घेण्यासाठी मुंबईत आली.
बिग बॉस ओटीटी 3 च्या घरात प्रवेश करण्यापूर्वी, चंद्रिका पिंकविलासोबत ती शो का करत आहे, ट्रोल का होत आहे असे बरेच काही बोलली. ती म्हणाली, “लोकांना कमेंट करायची असते. कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना. (लोक काही ना काही बोलतातच).
चंद्रिका दीक्षितने बिग बॉस ओटीटी 3 मध्ये येण्याची ऑफर का स्वीकारली याबद्दल देखील सांगितले. ती म्हणाली, “माझ्याबद्दल लोकांचा असा समज आहे की मी एक अत्यंत उद्धट आणि रागीट व्यक्ती आहे. बिग बॉस ओटीटी 3 मधील माझ्या सहभागामुळे, मला हे दाखवायचे आहे की मलापण भावना आहेत.
अभिनेता अनिल कपूरने होस्ट केलेल्या रिॲलिटी शोचा तिसरा सीझन 21 जूनपासून JioCinema वर सुरू झाला. बिग बॉस ओटीटी हा लोकप्रिय बिग बॉस फ्रँचायझीचा स्पिन-ऑफ आहे.
- Pushpa 3: अल्लू अर्जुनने घेतला मोठा निर्णय, चाहत्यांमध्ये वाढली आणखीनच उत्सुकता
- Rashmika Mandanna Trolled: रश्मिका मंदानाला तिच्या गोंधळामुळे करावा लागला ट्रोल्सचा सामना; मागितली चाहत्यांची माफी
- Pushpa 2: ‘पुष्पा 2’ द रुलच्या ऐतिहासिक यशाची कहाणी Pushpa 2 The Rule box office collection day 16
- Shahrukh Khan : सलमान खाननंतर आता शाहरुख खानला जिवे मारण्याची धमकी, पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
- राधिका-अनंतच्या संगीत सेरेमनीमधील प्रेग्नंट दीपिका पदुकोणच्या या लूकने वेधले सर्वांचे लक्ष