Anant Ambani Birthday : रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन (Mukesh Ambani) मुकेश अंबानी यांचा लहान मुलगा अनंत अंबानी यांचा आज वाढदिवस आहे. आज 10 एप्रिल रोजी अनंत अंबानी 29 वर्षांचे झाले आहेत. त्यांचा जन्म 10 एप्रिल 1995 रोजी झाला होता. अनंत अंबानी लवकरच राधिका मर्चंटसोबत लग्न करणार आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांचा विवाहपूर्व सोहळा पार पडला आहे.
त्यांच्या विवाहपूर्व सोहळ्याच्या कार्यक्रमाला जगातील अनेक मान्यवर उपस्थित होते. प्री-वेडिंग सेरेमनीपूर्वी अनंत अंबानींचे एक वेगळे रूप समोर आले आहे. वन्य प्राण्यांबद्दलचे त्यांचे प्रेम आणि त्यांच्या संवर्धनासाठी सुरू असलेल्या त्यांच्या कामाची माहिती त्यांनी स्वतः दिली आहे. वन्य प्राण्यांसाठी स्थापन करण्यात आलेल्या ‘वनतारा’ बद्दल माहिती देताना अनंत अंबानी यांनी सांगितले की, ‘वनतारा’ हे जगातील सर्वात मोठे रेस्क्यू सेंटर आहे.
आईकडून शिकून केली ‘वनतारा’ ची स्थापना
अनंत अंबानी यांनी सांगितले की, वन्य प्राण्यांचे संवर्धन करणे ही त्यांची आवड आहे. मुक जाणवरांची सेवा करणे ते त्यांच्या आई (Nita Ambani) नीता अंबानी यांच्याकडून शिकले आहेत. प्राण्यांची सेवा ही सर्वात मोठी सेवा असल्याचे त्यांनी सांगितले. अनंत अंबानी यांनी पुढे सांगितले की त्यांच्या आईने (Nita Ambani) यांनी जामनगर मध्ये 1000 एकरचे जंगल बनवले आहे. आणी जगातील सर्वात मोठी आंब्याची बाग जामनगरमध्ये असल्याचे त्यांनी सांगितले.
हेही वाचा 👉 Nita Ambani यांनी खरीदी केली Rolls-Royce कार, किंमत आहे ‘इतके’ करोड रुपये.
600 एकराचे मोठे जंगल उभारण्यात आले
अनंत अंबानी यांनी सांगितले की, कोविड काळात वन्य प्राण्यांसाठी बचाव केंद्र सुरू करण्यात आले होते. त्यासाठी त्यांनी 600 एकराचे मोठे जंगल तयार केले आहे. यामध्ये हत्तींसाठी संपूर्ण बचाव केंद्र बांधण्यात आले आहे. यामाध्यमातून 2008 मध्ये येथे पहिल्या हत्तीला वाचवण्यात आले होते. अनंत अंबानी म्हणाले की ग्रीन्स झूलॉजिकल रेस्क्यू सेंटर 2020 मध्ये सुरू झाले आणि एकूण 3,000 लोक आमच्यासोबत ग्रीन्स प्राणीशास्त्र संशोधन आणि बचाव केंद्रासाठी काम करत आहेत.
अनंत अंबानी यांनी सांगितले की, आम्ही येथे अशा लोकांना कामावर ठेवतो जे व्हेटर्नरीमध्ये पदवीधर आहेत. याशिवाय आमच्याकडे चांगले डॉक्टरही आहेत, ज्यांना प्राण्यांबद्दल खूप प्रेम आहे.