‘बिग बॉस ओटीटी सीझन 3’ लवकरच सुरू होत आहे. बिग बॉस ओटीटी सीझन 3 अभिनेता अनिल कपूर होस्ट करणार आहे. अनिल कपूरने हा शो आतापर्यंतचा सर्वात चांगला शो बनवण्याचे आश्वासन दिले आहे, ज्याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. या शोमध्ये असणाऱ्या स्पर्धकांविषयी जाणून घेण्यासाठी प्रेक्षक खूपच उत्सुक आहेत. दिल्लीची प्रसिद्ध (Vada Pav Girl) ‘वडा पाव गर्ल’ म्हणजेच चंद्रिका दीक्षित (Chandrika Dixit) देखील बिग बॉस ओटीटी सीझन 3 मध्ये दिसणार आहे. सोशल मीडिया स्टार चंद्रिका दीक्षितचे व्हिडिओ खूप व्हायरल होतात. आता ती बिग बॉस ओटीटीच्या घरात धुमाकूळ घालताना दिसणार आहे. चला तर मग जाणून घेऊया कोण आहे चंद्रिका दीक्षित…
वडा पाव गर्ल का प्रसिद्ध झाली?
चंद्रिका दीक्षितचा दिल्लीत वडा पाव चा गाडा लावण्यापासून बिग बॉस ओटीटी सीझन 3 पर्यंतचा प्रवास अजिबात सोपा नव्हता. चंद्रिका दीक्षित पहिला हल्दीराम कंपनीत काम करत होती तर पती यश गेरा रॅपिडो कंपनीत कामाला होता. पतीचे अनियमित काम आणि त्यात तीच्या मुलाला डेंग्यू झालेला होता. त्यावेळीच शेवटी तिने नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला होता. तेव्हा तिच्या स्वयंपाकाच्या आवडीने तिला पुढे जाण्याची प्रेरणा दिली.
तिने दिल्लीतील सैनिक विहार परिसरात वडा पाव चा व्यवसाय सुरू केला. त्यानंतर चंद्रिका दीक्षित ‘वडा पाव गर्ल’ म्हणून प्रसिद्ध झाली. तीचा साधा वडापाव चा गाडा खूप प्रसिद्ध झाला. तिने बनवलेला वडा पाव खाण्यासाठी दूरदूरवरून लोक येऊ लागले. ती खरी प्रसिद्धीच्या झोतात आली ते जेव्हा फूड व्लॉगर अमित जिंदालने तीचा व्हिडीओ बनवला, ज्यामध्ये तिचे बडा पाव बनवण्याचे आणि विकण्याचे कौशल्य दिसून आले.
अमित जिंदालचा वडा पाव गर्ल व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि त्यामुळे चंद्रिका रातोरात सोशल मीडियावर चमकली. दुसऱ्याच दिवशी तीच्या वडापाव च्या गाड्यावर लोकांची मोठी रांग लागली होती. प्रसिद्धीनंतरचा प्रवासही तिच्यासाठी तितका सोपा नव्हता. या व्हिडिओनंतर तिचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल झाला, ज्यामध्ये ती खूप रडत होती. यामध्ये ती दिल्ली महानगरपालिकेच्या (एमसीडी) अधिकाऱ्यांवर छळवणुकीचे आरोप करताना दिसली. तिने 35 हजार रुपये फी भरूनही लाच घेतल्याचा आरोप केला. तीच्या व्हिडीओनंतर अनेक छोट्या व्यावसायिकांच्या समस्या समोर आल्या.
🔥 ट्रेंडिंग 👉 आठ अब्ज सोळा कोटी रुपये असणाऱ्या दीपिका पदुकोणला ‘या’ अभिनेत्रीने टाकले मागे.
नंतर चंद्रिकाचा वडापावचा स्टॉल पाहून अनेकांनी तिथेच वडापावचा व्यवसाय सुरू केला. वाढती स्पर्धा पाहून तिने ‘डॉली चायवाला’ सुनील पाटील याच्याशी हातमिळवणी केली. तसेच ‘बिग बॉस’च्या सनी आर्या आणि पुनीत सोबत काम केले आहे. यानंतर तिची लोकप्रियता खूपच वाढू लागली. तीच्या लोकप्रियतेचा तिने पुरेपूर फायदा करून घेतला. आज चंद्रिका दीक्षित ला कोणत्याही ओळखीची गरज नाही. तिने 70 लाख रुपयांहून अधिक किमतीची फोर्ड मस्टँग कार खरेदी केली आहे.
- राधिका-अनंतच्या संगीत सेरेमनीमधील प्रेग्नंट दीपिका पदुकोणच्या या लूकने वेधले सर्वांचे लक्ष
- रामभाऊ, बाळासाहेब, सुभाषराव यांच भाव भक्ती विठोबा गाण पाहिल का? डोळ्यातून पाणी आणणारा व्हिडिओ
- मोठा खुलासा ‘या’ दिग्दर्शकाने करीना कपूर खानवर केला होता अन्याय, त्यानंतर करीना…
- सोनाक्षी सिन्हाला झहीर इक्बालशी लग्न करण पडल महागात, गमवावा लागला करोडोंचा चित्रपट