Nana Patekar: मी किती नालायक होतो; मोठ्या मुलाच्या निधनावर पहिल्यांदाच बोलले नाना पाटेकर, लाज वाटायची म्हणाले
Image Source: इंस्टाग्राम
Image Source: इंस्टाग्राम
नाना पाटेकर यांनी विविधांगी भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनात एक वेगळ स्थान निर्माण केल आहे.
Image Source: इंस्टाग्राम
नाना पाटेकर अभिनयाबरोबर आपल्या स्पष्टवक्तेपणा आणि साधेपणा साठी ओळखले जातात.
Image Source: इंस्टाग्राम
नुकत्याच झालेल्या 'लल्लनटॉप' च्या मुलाखतीत त्यांनी अनेक विषयांवर दिलखुलास गप्पा मारल्या. मुलाखतीत ते पाहिल्यांदाच त्यांच्या मुलाच्या मृत्यूविषयी बोलले. आपण कसला बाप होतो हे सांगताना ते भावुक झाले.
Image Source: इंस्टाग्राम
नानांनी सांगितल, माझा मोठा मुलगा जन्मापासूनच आजारी होता. त्याला बरेच प्रॉब्लेम होते. त्याला डोळ्याची समस्या होती, त्याला दिसत नव्हत. जन्मापासून त्याचा ओठ फाटलेला होता.
Image Source: इंस्टाग्राम
मी किती नालायक माणूस होतो बघा हा, त्याला पहिल्यांदा पाहून माझ्या मनात आल की लोक काय म्हणतील? नानाचा मुलगा असा कसा आहे? काय विचार करतील लोक? हे विचार आधी माझ्या मनात आले.
Image Source: इंस्टाग्राम
त्यांनी सांगितल, त्याचं नाव दुर्वास होत. त्याला काय वाटतय याच्याशी मला काहीच देण घेण नव्हत. अडीच वर्षाचा असताना तो गेला. पण या अडीच वर्षात त्याने खूप काही शिकवल.