Mother's Day 2024 Wishes: आईला नक्कीच आवडतील, पाठवा हे खास मातृदिन 2024 शुभेच्छा संदेश

यंदा आज 12 May, 2024 रोजी Mother's Day साजरा केला जात आहे. त्यानिमित्ताने आईला पाठवा हे खास मातृदिन 2024 संदेश.

डोळे मिटून प्रेम करते ती प्रेयसी असते डोळे मिटल्यासारखे करते, ती मैत्रीण असते डोळे वटारून प्रेम करते ती पत्नी असते डोळे मिटेपर्यंत प्रेम करते तीच आई असते.. मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

आई म्हणजे स्वर्ग आई म्हणजे सर्व काही कितीही जन्म घेतले तरी ऋण फेडू शकणार नाही मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

आई म्हणजे मंदिराचा उंच कळस आई म्हणजे अंगणातील पवित्र तुळस आई म्हणजे भजनात गुणगुणावी अशी संतवाणी आई म्हणजे वाळवंटात प्यावे असे थंड पाणी Happy Mothers Day 2024!

कोठेही न मागता भरभरुन मिळालेले दान म्हणजे ‘आई’, विधात्याच्या कृपेचे निर्मळ वरदान म्हणजे ‘आई’ मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

दु:खात हसवी, सुखात झुलवी, गाऊनी गोड अंगाई जगात असे काहीही नाही, जशी माझी प्रिय आई ठेच लागता माझ्या पायी, वेदना होती तिच्या हृदयी तेहतीस कोटी देवांमध्ये, श्रेष्ठ मला माझी “आई” मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

🔴ट्रेंडिंग🔉🔥💓💕सोनाली कुलकर्णीचा 'Mothers Day 2024' खास साडी लूक व्हायरल💓💕,📷,फोटो पाहण्यासाठी खाली क्लिक करा👇