‘सन ऑफ सरदार 2’ चित्रपटाबद्दलच्या या बातमीने सलमान खानच्या चाहत्यांची उत्कंठा अजूनच वाढली

2 Min Read
Son Of Sardaar 2 Marathi News
Son Of Sardaar 2 News (फोटो : सोशल मीडिया)

Son of Sardaar 2: 2 एप्रिलला मोठ्या थाटामाटात अजय देवगणचा वाढदिवस साजरा झाला. सलमान खान, रितेश देशमुख यांच्यासह अनेक कलाकारांनी तसेच चाहत्यांनी अजय देवगणला वाढदिवसाच्या खास शुभेच्छा दिल्या.

2012 साली रिलीज झालेला एक कॉमेडी आणि ॲक्शन-पॅक्ड चित्रपट ‘सन ऑफ सरदार’ हा तर तुम्हाला आठवतच असेल. ज्याचे दिग्दर्शन अश्वनी धीर यांनी केले होते आणी हा एसएस राजामौली यांच्या 2010 च्या तेलगू चित्रपट ‘मर्यादा रमन्ना’चा रिमेक होता. 13 नोव्हेंबर 2012 रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात अजय देवगण, संजय दत्त, सोनाक्षी सिन्हा आणि जुही चावला यांच्या प्रमुख भूमिका असून त्यात सलमान खानचा देखील एक विशेष रोल दाखवण्यात आला होता. Son Of Sardaar पडद्यावर हिट ठरला. आता ‘सन ऑफ सरदार 2’ चित्रपटाबद्दल एक मोठी बातमी समोर येतेय, ती जाणून घेऊ.

‘सन ऑफ सरदार 2’चे दिग्दर्शक कोण आहेत?

मीडिया रिपोर्टनुसार, ‘सन ऑफ सरदार 2’ चे दिग्दर्शक पंजाबी चित्रपट निर्माते विजय कुमार अरोरा हे आहेत आणी सन ऑफ सरदार 2 चित्रपट सध्या प्री-प्रॉडक्शनमध्ये आहे तसेच ‘सन ऑफ सरदार 2’च्या रिलीजची तारीख अद्याप निश्चित नसली तरी 2025 च्या मध्यात हा चित्रपट रिलीज होईल व 2024 वर्षाच्या अखेरीस चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरूवात होईल. मात्र, या बातम्यांना अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

आज व्हायरल 👉 तापसी पन्नूच्या लग्नाचा व्हिडिओ व्हायरल, नाचत सुटली नवऱ्याकडे.

👉 रश्मिका मंदाना विजय देवरकोंडा सोबत साजरा करणार वाढदिवस, फोटो व्हायरल.

कोण आहेत विजय कुमार अरोरा?

सिनेमॅटोग्राफर पासून दिग्दर्शक बनलेले विजय कुमार अरोरा हे पंजाबी सिनेमातील त्यांच्या यशस्वी कामासाठी ओळखले जातात, विजय कुमार अरोरा यांनी ‘हरजीता’ (2018), ‘बेबी डॉल्स’ (2019), ‘काली जोट्टा’ (2023) यांसारख्या हिट चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. 

‘सन ऑफ सरदार 2’ बॉक्स ऑफिस कलेक्शन अंदाज 

सन ऑफ सरदार चित्रपटाने भारतात एकूण ₹ 105.10 कोटी रुपयांची कमाई केली होती आणी चित्रपटाची जगभरातील एकूण कमाई ₹ 150.00 कोटी रुपये होती. आता दिग्दर्शक विजय कुमार अरोरा आणी सन ऑफ सरदार 2 मध्ये सलमान खान याची एन्ट्री यामुळे ‘सन ऑफ सरदार 2’ बॉक्स ऑफीसवर पूर्वीपेक्षा चांगली कमाल दाखवेल अशी अशा आहे.

WhatsApp Group Join Now

व्हायरल वेब स्टोरीज

लेटेस्ट मनोरंजन विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

फॉलो करा 👇

Follow Karamnuk On Google News
लेटेस्ट मराठी मनोरंजन बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल न्यूज वर फॉलो करा.
Share This Article
कोण आहे Pushpa 2 मधील Kissik गाण्याने चर्चेत आलेली श्रीलीला Rashmika Mandanna: रश्मिका मंदानाचा गोंधळ, मागितली चाहत्यांची माफी पुष्पा 2 चा बॉक्स ऑफिसवर धमाका! 16 दिवसांत ‘इतके’ कोटीं? 18 ऑक्टोबर ला रिलीज होतोय प्रियांका चोप्रा चा मराठी चित्रपट करिना ला बनायच नव्हत अभिनेत्री, या प्रोफेशन मध्ये होता रस