Rani Mukherjee Birthday : आज 21 मार्च राणी मुखर्जीचा वाढदिवस. अभिनेत्री राणी मुखर्जी आज तिचा वाढदिवस साजरा करत आहे. राणी मुखर्जीला तिच्या वाढदिवसानिमित्त तिचे चाहते व फिल्म इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटी तिचे अभिनंदन करत आहेत. आजच्या दिवशी राणी मुखर्जी काय विशेष करते हे जाणून घेण्यासाठी राणीचे चाहते खूप उत्सुक आहेत. एएनआय या वृत्तसंस्थेला राणी मुखर्जीशी संवाद साधला व तिला आज ती आज काय विशेष करते हा प्रश्न विचारला तेव्हा स्वतः राणी मुखर्जीने याचा खुलासा केला.
एएनआय संवादकांनी जेव्हा राणी मुखर्जीला विचारले आले की तिच्या वाढदिवसाची काय खास तयारी केली जाते? यावर राणी म्हणाली, ‘दरवर्षी माझे पती आदित्य चोप्रा आणि मुलगी मला सरप्राईज देतात. या वर्षी पाहू’. पुढे राणी म्हणाली, माझ्यासाठी सर्वात चांगली गोष्ट म्हणजे माझे सर्व जवळचे मित्र आणि कुटुंबातील सदस्य माझ्या वाढदिवसाला एकत्र येतात. त्यांच्यासोबत वेळ घालवायला मिळतो हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे.
हेही वाचा 👉 Alizeh Agnihotri: अलिझेह अग्निहोत्रीने सांगितले तिचा आवडता मामा कोण, म्हणाली सलमान अजून लहान.
21 मार्च 1978 रोजी जन्मलेली राणी मुखर्जी आज तिचा 46 वा वाढदिवस साजरा करत आहे. राणी मुखर्जीने ‘राजा की आयेगी बारात’ या चित्रपटातून बॉलीवूड मध्ये पदार्पण केले होते, पण तिला एक प्रसिद्द अभिनेत्री बनवले ते करण जोहरच्या ‘कुछ कुछ होता है’ या चित्रपटाने. राणीचे वडील राम मुखर्जी हे प्रसिद्ध दिग्दर्शक होते.
बॉलीवूड मध्ये येण्यासाठी राणी मुखर्जीला खूप संघर्ष करावा लागला. तिची उंची आणि आवाजामुळे तिच्यावर बरीच टीका होत होती. राणी मुखर्जीने 2014 मध्ये आदित्य चोप्रासोबत लग्न केले. दोघांना एक मुलगी आहे. राणीच्या मुलीचे नाव आदिरा आहे.
👉 Baazigar Re-release: 31 वर्षानंतर पुन्हा रिलीज होत आहे शाहरुखचा ‘बाजीगर’.