Monday Box Office : ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ ची संथ सुरुवात, ‘मडगाव एक्सप्रेस’ सुसाट, जाणून घ्या योद्धा आणी शैतान चे हाल

3 Min Read
Monday Box Office Collection Swatantrya Veer Savarkar Madgav Express Yoddha Shaitan
Monday Box Office Collection Swatantrya Veer Savarkar Madgav Express Yoddha Shaitan

Monday Box office collection news : सध्या ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’, मडगाव एक्सप्रेस यांचबरोब सिद्धार्थ मल्होत्राचा योद्धा आणी अजय देवगणचा शैतान यांच्यात चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांची गर्दी खेचण्यावरून स्पर्धा सुरु आहे. जाणून घेऊया या स्पर्धेत कोण आहे आघाडीवर.

अजय देवगणचा शैतान आणि सिद्धार्थ मल्होत्राचा योद्धा यांची चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षका मिळवण्यावरून स्पर्धा सुरूच होती आता त्यात मागच्या शुक्रवारपासून रणदीप हुड्डा याचा ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ आणि कुणाल खेमूचा ‘मडगाव एक्सप्रेस’ या चित्रपटांची भर पडली आहे. चारीही चित्रपट बॉक्स ऑफिस कलेक्शनच्या बाबतीत एकमेकांना चांगलीच टक्कर देत आहेत. चला तर मग जाणून घेऊया सोमवारी कोणत्या चित्रपटाने किती कमाई केली.

स्वातंत्र्य वीर सावरकर

स्वातंत्र्य वीर सावरकर

रणदीप हुड्डा यांचा ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ हा स्वातंत्र्य वीर सावरकर यांच्या जीवनावर आधारित बायोपिक चित्रपट 22 मार्च 2024 रोजी राष्ट्रीय शहीद दिनानिमित्त थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ चित्रपटाला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले. या चित्रपटात रणदीप हुड्डा प्रमुख भूमिकेत आहे. या चित्रपटातून त्यांनी चित्रपट दिग्दर्शनास सुरुवात केली आहे. चौथ्या दिवशी म्हणजेच सोमवारी ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ या चित्रपटाने 2.25 कोटींची कमाई केली असून या चित्रपटाचे एकूण कलेक्शन 8.25 कोटींवर पोहोचले आहे.

सध्या व्हायरल 👉 आकांक्षा पुरीने विवस्त्र होऊन साजरी केली होळी, तिच्या ह्या हॉट फोटोशूटने सोशल मीडियावर खळबळ.

मडगाव एक्सप्रेस

 मडगाव एक्सप्रेस

कलयुग, ढोल अशा चित्रपटांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारा अभिनेता कुणाल खेमू दिग्दर्शित ‘मडगाव एक्सप्रेस’ हा चित्रपट 22 मार्च 2024 रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. चित्रपटगृहांमध्ये चित्रपटाची संथ सुरुवात झाली होती. आता कुणाल खेमूच्या या चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.  चौथ्या दिवशी म्हणजेच सोमवारी मडगाव एक्सप्रेस चित्रपटाने 2.60 कोटींची कमाई केली आहे. मडगाव एक्सप्रेस या चित्रपटाची एकूण कमाई आता 9.65 कोटींवर पोहोचली आहे.

👉 Video : “माझ नाव करिश्मा नाही…”, छामियान सांगितल तीच खर नाव, आज पर्यंत कुणालाच माहित नव्हत.

योद्धा

 योद्धा

सिद्धार्थ मल्होत्राचा ‘योद्धा’ हा चित्रपट रिलीज होण्यापूर्वीपासूनच चर्चेत होता. या चित्रपटात सिद्धार्थसोबत दिशा पटानी आणि राशि खन्ना प्रमुख भूमिकेत आहेत. सागर आंब्रे आणि पुष्कर ओझा दिग्दर्शित ‘योद्धा’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. ‘योद्धा’ ने 11व्या दिवशी 1.7 कोटींची कमाई केली आहे.  यासह ‘योद्धा’ चित्रपटाने एकूण 29.01 कोटींची कमाई केली आहे.

👉 जान्हवी कपूर गुडघे टेकत 3500 पायऱ्या चढून का गेली तिरुपती मंदिरात? पाहा व्हिडिओ.

शैतान

 शैतान

अजय देवगण आणि आर माधवन यांचा ‘शैतान’ प्रेक्षकांना खूपच आवडला आहे.  चित्रपट प्रदर्शित होऊन 18 दिवस झाले आहेत. विकास बहल दिग्दर्शित ‘शैतान’ चित्रपटाचे बजेट अंदाजे 65 कोटी रुपये असल्याची चर्चा आहे. ‘शैतान’ चित्रपटाच्या कमाईत सतत चढ-उतार होत आहेत. शैतानने 18 व्या दिवशी 3.25 कोटींची कमाई केली आहे. यासह शैतान या चित्रपटाने आता एकूण 128.80 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

WhatsApp Group Join Now

व्हायरल वेब स्टोरीज

लेटेस्ट मनोरंजन विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

फॉलो करा 👇

Follow Karamnuk On Google News
लेटेस्ट मराठी मनोरंजन बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल न्यूज वर फॉलो करा.
Share This Article
कोण आहे Pushpa 2 मधील Kissik गाण्याने चर्चेत आलेली श्रीलीला Rashmika Mandanna: रश्मिका मंदानाचा गोंधळ, मागितली चाहत्यांची माफी पुष्पा 2 चा बॉक्स ऑफिसवर धमाका! 16 दिवसांत ‘इतके’ कोटीं? 18 ऑक्टोबर ला रिलीज होतोय प्रियांका चोप्रा चा मराठी चित्रपट करिना ला बनायच नव्हत अभिनेत्री, या प्रोफेशन मध्ये होता रस