२० वर्षांपूर्वी बजेटपेक्षा दुप्पट कमाई करणारा हृतिक रोशनचा ‘हा’ चित्रपट पुन्हा होणार प्रदर्शित

2 Min Read
हृतिक रोशनची बातमी
हृतिक रोशनची बातमी (Image Source: इंस्टाग्राम/हृतिक रोशन)

Hrithik Roshan News: बॉलीवूड अभिनेता हृतिक रोशनचा २० वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेला ‘हा’ सुपरहिट चित्रपट पुन्हा चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे.

बॉलीवूड अभिनेता हृतिक रोशनने नुकताच त्याच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करत त्याच्या ‘लक्ष्य’ चित्रपटाला 20 वर्षे पूर्ण झाल्याची माहिती दिली आहे. 

लक्ष्य’ चित्रपटाचे पुन:प्रदर्शन

2004 मध्ये प्रदर्शित झालेल्या कारगिल युद्धावर आधारित ‘लक्ष्य’ या चित्रपटाला 20 वर्षे पूर्ण झाली आहेत. या खास प्रसंगी अमिताभ बच्चन, हृतिक रोशन, आणि प्रीती झिंटा यांनी सांगितले की, या यशाचा आनंद साजरा करण्यासाठी ते पुन्हा मोठ्या पडद्यावर दिसणार आहेत. 

हृतिक रोशन ची इंस्टाग्राम पोस्ट

हृतिक रोशनने या चित्रपटातील काही संस्मरणीय क्षणही X वर (म्हणजेच पूर्वीचे ट्विटर) शेअर केले आहेत. त्याने लिहिले, “चला, अशा चित्रपटाचा प्रवास पुन्हा जिवंत करू ज्याने असंख्य स्वप्ने आणि पिढ्यांना प्रेरणा दिली. ‘लक्ष्य’ या चित्रपटाचे दिग्दर्शन फरहान अख्तर आणि रितेश सिधवानी यांनी केले होते.

लक्ष्य’ चित्रपटाची कथा आणि यश

‘लक्ष्य’ या चित्रपटात करण शेरगिलची कथा दाखवण्यात आली आहे, जो दिल्लीतील एका श्रीमंत उद्योगपतीचा मुलगा असतो. तो एक अतिशय आळशी आणि ध्येयहीन तरुण असतो, जो नंतर भारतीय सैन्यात सामील होतो. हा चित्रपट 14 कोटींच्या बजेटमध्ये बनवण्यात आला होता आणी चित्रपटाने 26 कोटींहून अधिक कमाई केली होती. 

हृतिक रोशन वर्क फ्रंटबद्दल 

हृतिक रोशनच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, हृतिकचा पुढचा प्रोजेक्ट ‘वॉर 2’ आहे, ज्यामध्ये तो ज्युनियर एनटीआर आणि कियारा अडवाणीसोबत दिसणार आहे.

‘लक्ष्य’ चित्रपटाच्या पुन:प्रदर्शनामुळे हृतिक रोशनच्या चाहत्यांना त्यांच्या आवडत्या चित्रपटाचा पुन्हा आनंद घेता येणार आहे. हा चित्रपट 21 जून 2024 रोजी थिएटरमध्ये पुन्हा येणार आहे.

WhatsApp Group Join Now

व्हायरल वेब स्टोरीज

लेटेस्ट मनोरंजन विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

फॉलो करा 👇

Follow Karamnuk On Google News
लेटेस्ट मराठी मनोरंजन बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल न्यूज वर फॉलो करा.
Share This Article
18 ऑक्टोबर ला रिलीज होतोय प्रियांका चोप्रा चा मराठी चित्रपट करिना ला बनायच नव्हत अभिनेत्री, या प्रोफेशन मध्ये होता रस ‘माधुरी भाभी’चा मोठा खुलासा, इंडस्ट्रीत टॅलेंट बघून होत नाही कास्टिंग इलियाना डिक्रूझ च्या मुलाला पाहील का? अमिताभ-अजय सोबत केला होता नताशा ने पहिला चित्रपट, कमावलेले इतके करोड