हार्दिक पांड्याला आयसीसी स्पर्धेत पहिल्यांदाच मिळाला हा पुरस्कार; खूप दिवस पाहिली वाट

2 Min Read
hardik pandya wins first icc award
Image Source: इंस्टाग्राम

Hardik Pandya : दीर्घकाळ वाट पहिल्यानंतर हार्दिक पांड्या ला प्रथमच आयसीसी स्पर्धेत ‘हा’ पुरस्कार मिळाला, याची हार्दिक पांड्या खूप दिवसांपासून वाट पाहत होता. हार्दिक पांड्या पहिल्यांदाच आयसीसी स्पर्धेत सामनावीर ठरला त्याने बांगलादेश चा माज मोडला. पहिल्यांदाच त्याने 27 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले आणि नंतर गोलंदाजी करताना एक विकेटही घेतली. 

IPL 2024 मध्ये ज्या खेळाडूच्या कामगिरीवर आणि कर्णधारपदावर टीका होत होती त्याच हार्दिक पांड्या चे आज सर्वांकडून कौतुक होत आहे. हार्दिक पंड्या एक अष्टपैलू खेळाडू असल्याचे त्याने सिद्ध करून दाखवले आहे, हार्दिक पांड्या ICC पुरुष T20 विश्वचषक 2024 मध्ये टीम इंडियासाठी सर्वात मौल्यवान खेळाडू आहे.  हार्दिक पांड्याने केवळ बॅटनेच नाही तर चेंडूनेही त्याचे कौशल्य दाखवून तो संघासाठी महत्त्वाचा खेळाडू असल्याचे पुन्हा सिद्ध केले आहे. हार्दिक पांड्याने प्रथमच आयसीसी स्पर्धेत सामनावीराचा पुरस्कार पटकावण्यात यश मिळविले आहे. तो 2016 पासून आयसीसी स्पर्धा खेळत आहे. पण सामनावीर पुरस्काराची हार्दिक पांड्याची प्रतीक्षा आता संपली आहे.

🔥 व्हायरल व्हिडीओ 👉 Pune Girl Reel : मरता मरता वाचली मुलगी व्हिडीओ व्हायरल.

हार्दिक पांड्या बातमी
Image Source: इंस्टाग्राम

T20 विश्वचषक 2024 च्या सुपर 8 सामन्यात हार्दिक पांड्याने बांगलादेश ला गार केले. आधी त्याने 27 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले आणि नंतर गोलंदाजी करताना एक विकेटही घेतली. या तुफान खेळीसाठी हार्दिकची सामनावीर म्हणून निवड करण्यात आली. आतापर्यंतच्या आयसीसी टूर्नामेंट सामन्यात हार्दिकचा हा पहिलाच सामनावीर पुरस्कार आहे. हार्दिक पांड्याने याआधी टी-२० विश्वचषकात अर्धशतक केले होते, पण त्या सामन्यात त्याला सामनावीराचा पुरस्कार मिळाला नव्हता.  विश्वचषकातही त्याला अशी कामगिरी करता आली न्हवती. या सामन्यात हार्दिकने 27 चेंडूत 4 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने आपले अर्धशतक पूर्ण केले.

🔴 हेही वाचा 👉 गाड्यावर वडापाव विकून मुलीने रोज कमावले इतके रुपये, ऐकूण व्हाल थक्क.

हार्दिक पांड्या सामन्यानंतरच्या समारंभात म्हणाला. “आम्ही सर्वांनी एकत्र येऊन चांगली कामगिरी केली आहे आणि आमच्या योजना अंमलात आणल्या आहेत.” देशासाठी खेळण्याचे भाग्य मला मिळाले आहे, मला मोठी दुखापत झाली होती, मला पुनरागमन करायचे होते, पण देवाचा वेगळाच प्लॅन्स होता मी दुसऱ्या दिवशी राहुल (द्रविड) सरांशी बोलत होतो तेव्हा ते मला म्हणाले नशीब त्यांनाच साथ देते जे कठोर परिश्रम करतात आणि ती गोष्ट माझ्या डोक्यात राहिली.”

WhatsApp Group Join Now

व्हायरल वेब स्टोरीज

लेटेस्ट मनोरंजन विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

फॉलो करा 👇

Follow Karamnuk On Google News
लेटेस्ट मराठी मनोरंजन बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल न्यूज वर फॉलो करा.
Share This Article
करिना ला बनायच नव्हत अभिनेत्री, या प्रोफेशन मध्ये होता रस ‘माधुरी भाभी’चा मोठा खुलासा, इंडस्ट्रीत टॅलेंट बघून होत नाही कास्टिंग इलियाना डिक्रूझ च्या मुलाला पाहील का? अमिताभ-अजय सोबत केला होता नताशा ने पहिला चित्रपट, कमावलेले इतके करोड बॅड न्यूज ची धमाकेदार सुरुवात, समोर आली ओपनिंग कमाई