Jannat 3: इमरान हाशमी हा बॉलीवूड मधील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. इमरान हाशमीच्या अनेक चित्रपटांनी बॉक्स ऑफीसवर धुमाकूळ घातला आहे. इमरान हाशमीची नुकतीच रिलीज झालेली वेब सीरीज शोटाइम (Showtime) ही देखील प्रेक्षकांना चांगलीच आवडली आहे, वेब सीरिज शोटाइम व्यतिरिक्त, (Emraan Hashmi) इमरान हाशमी सारा अली खानसोबत ए वतन मेरे वतन या चित्रपटातही दिसला होता.
इमरान हाशमीचा 2008 मध्ये आलेला ‘जन्नत’ हा चित्रपट तर तुम्हाला आठवत असेलच. जन्नत चित्रपटाची जबरदस्त कथा आणि अतिशय सुरेख गाणी यामुळे तो प्रेक्षकांच्या मनात घर करून गेला.
हेही वाचा 👉 श्रद्धा कपूरच्या प्रेमाला मिळाली घरच्यांची मंजूरी, ‘याच्याशी’ लवकरच करणार लग्न.
जन्नत चित्रपटानेच इमरान हाशमीला बॉलीवूड मध्ये एका नव्या शिखरावर न्हेऊन ठेवल. यानंतर 2012 मध्ये या चित्रपटाचा सिक्वेल जन्नत 2 हा देखील सुपरहिट ठरला, प्रेक्षकांना दोन्ही चित्रपट खूप आवडले. इमरानच्चे चाहते (Jannat 3) ‘जन्नत 3’ हा चित्रपट कधी येणार याची वाट पाहत आहेत. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत इमरान हाशमीने ‘जन्नत 3’ चित्रपटाबद्दल एक मोठा खुलासा केला आहे.
मुलाखतीत बोलताना इमरान म्हणाला, जन्नत 3 चित्रपट माझ्यासाठी ‘नई बोतल में पुरानी शराब जैसा है’. जन्नत 3 कधी येईल यावर इमरान म्हणाला यासाठी निर्माते महेश भट्ट आणि मुकेश भट्ट यांना एकत्र यावे लागेल. जे थोडे कठीण आहे. जर नशीबाने असे घडले तर तो माझ्यासाठी चमत्कार असेल.
इमरानने सांगितले कि मि माझ्या जुन्या ‘बॅड बॉय’ पात्रात परत आपल्यासमोर येतोय. येत्या काळात माझे अनेक नवीन चित्रपट येत आहेत. त्यात मि आपल्याला पुन्हा एकदा माझ्या आधीच्या ‘बॅड बॉय’च्या रोलमध्ये दिसेन.
हेही वाचा 👉 काजोलची आई तनुजा आणि शोमू मुखर्जीच्या लग्नाचा फोटो व्हायरल, एकटीन सांभाळल….
लेटेस्ट मनोरंजन बातम्यांच्या अपडेट्स साठी आत्ताच करमणूक मराठी बातम्या व्हॉट्सॲप चॅनेल जॉईन करा.
👉 Shaitaan Ott रिलीज साठी सज्ज, या Ott Platform वर होणार रिलीज.