Vidya Balan: बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन सध्या तिच्या ‘दो और दो प्यार’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. तिच्या बोल्ड आणि स्पष्टवक्ते शैलीसाठी प्रसिद्ध असलेल्या विद्या बालनच्या नवीन चित्रपटांची चाहते आतुरतेने वाट पाहत असतात. तीचा (Do Aur Do Pyaar) ‘दो और दो प्यार’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार असून हा एक रोमँटिक चित्रपट आहे. या चित्रपटाबाबत विद्या बालनच्या सतत मुलाखती सुरु आहेत. यादरम्यान विद्या बालनने तिची मनापासूनची इच्छा व्यक्त करून सर्वांनाच आश्चर्यचकित केले आहे. विद्या बालनची इच्छा आहे कि तीला बॉलिवूडच्या बादशाहसोबत रोमान्स करायचा आहे.
विद्या बालनने तिच्या करिअरमध्ये अनेक चित्रपट केले आहेत. 2007 मध्ये रिलीज झालेल्या विद्याच्या ‘हे बेबी’ या चित्रपटात शाहरुख खानने कॅमिओ केला होता. या चित्रपटातील ‘मस्त कलंदर’ या गाण्यात शाहरुख दिसला होता. या चित्रपटात त्याच्यासोबत अक्षय कुमार, रितेश देशमुख आणि फरदीन खान होते. मात्र, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही खास कमाई करू शकला नाही. मात्र आता विद्याने शाहरुखसोबत रोमँटिक चित्रपट करण्याची इच्छा व्यक्त केल्याने यावर शाहरुखची काय प्रतिक्रिया येते याची सर्वाना उत्सुकता आहे.
सध्या विद्या बालन तिच्या आगामी ‘दो और दो प्यार’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटासाठी दिलेल्या एका मुलाखतीदरम्यान विद्याला बॉलीवूडमध्ये कोणत्या अभिनेत्यासोबत काम करायला आवडेल असे विचारले असता ती म्हणाली, “मला शाहरुखसोबत एका रोमँटिक चित्रपटात काम करायचे आहे.”
‘दो और दो प्यार’ चित्रपट
‘दो और दो प्यार’ या चित्रपटात विद्या बालन आणि प्रतीक गांधी यांच्याशिवाय इलियाना डिक्रूझ आणि सेंधील राममूर्ती दिसणार आहेत. ‘दो और दो प्यार’ हा चित्रपट 19 एप्रिल रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. विद्या बालनला नव्या रूपात पाहण्यासाठी तिचे चाहते खूप उत्सुक आहेत.