बुधवार, 13 फेब्रुवारी 2025: Deepika Padukone Black Gown Look Dubai 2025 – बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण पुन्हा एकदा तिच्या स्टनिंग लूकमुळे चर्चेत आहे. दुबईतील एका ज्वेलरी ब्रँडच्या 25 व्या वर्धापन दिन सोहळ्यात ती ग्लॅमरस अंदाजात दिसली. आई झाल्यानंतरची ही तिची पहिली ओव्हरसीज आउटिंग होती.

ब्लॅक गाऊनमध्ये दीपिकाचा रॉयल अंदाज
दीपिकाने (Deepika Padukone) ऑफ-शोल्डर प्लंजिंग नेकलाइन असलेला ब्लॅक गाऊन कॅरी केला. डायमंड स्टेटमेंट नेकलेस, स्मोकी आयमेकअप आणि मिनिमल मेकअपमुळे तिचा लूक आणखीनच उठून दिसत होता. स्लीक बन आणि डायमंड इअररिंग्समुळे तिने आपला स्टाईल गेम कायम ठेवला.

आई झाल्यानंतरही फिटनेस कायम
8 सप्टेंबर 2024 रोजी दीपिकाने तिच्या मुलीला जन्म दिला. रणवीर सिंग आणि तिच्यासाठी हा पहिला पालकत्वाचा अनुभव आहे. मात्र, आई झाल्यानंतरही दीपिकाच्या फिगरमध्ये कोणताही बदल दिसत नाही. अवघ्या पाच महिन्यांत ती परत शेपमध्ये आली असून, तिच्या फिटनेसवर चाहते फिदा झाले आहेत.

सोशल मीडियावर चाहत्यांची उत्सुकता
दीपिकाने स्वतः तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर फोटो शेअर केले. चाहत्यांनी तिच्या लूकच कौतुक करत “क्वीन इज बॅक” अशा कमेंट्स केल्या. अनेकांनी हार्ट इमोजी टाकत तिच्या सौंदर्याच कौतुक केल.

वर्कफ्रंटवर काय आहे अपडेट?
दीपिकाची शेवटची रिलीज ‘कल्की 2898 AD’ होती. या चित्रपटात तिने प्रभाससोबत स्क्रीन शेअर केली होती. सध्या ती मातृत्वाचा आनंद घेत असून, लवकरच तिच्या आगामी चित्रपटाबाबत अपडेट्स मिळण्याची शक्यता आहे.
