बडे मियाँ छोटे मियाँ चित्रपटाच्या चाहत्यांनी सिनेमागृहात केला जबरदस्त डान्स, व्हिडिओ व्हायरल

2 Min Read
Bmcm Viral Video Bade Miyaan Chote Miyaan Fans Dancing
Bmcm Viral Video Bade Miyaan Chote Miyaan Fans Dancing

BMCM Viral Video : अक्षय कुमार आणी टायगर श्रॉफच्या बडे मियाँ छोटे मियाँ या ॲक्शनने भरलेल्या चित्रपटाची चाहत्यांमध्ये क्रेझ वाढत आहे. अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफचे फक्त भारतातच नाही तर परदेशातही चाहते आहेत. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये टायगर श्रॉफ आणि अक्षय कुमारचे इथिओपियन चाहते बडे मियाँ छोटे मियाँ चित्रपटाच्या गाण्यावर नाचताना दिसत आहेत.

‘बडे मियाँ छोटे मियाँ’ हा चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडला आहे. या चित्रपटात चाहत्यांना अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफची जोडी पहिल्यांदाच एकत्र दिसली. या जोडीला एकत्र पाहणे हा टायगर श्रॉफ आणी अक्षयच्या चाहत्यांसाठी एक नवीन अनुभव आहे. अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ व्यतिरिक्त या चित्रपटात मानुषी छिल्लर आणि आलिया एफ. प्रमुख भूमिकेत आहेत. या चित्रपटात सोनाक्षी सिन्हा देखील एका छोट्या भूमिकेत आहे.

11 एप्रिलला ईदच्या दिवशी प्रदर्शित झालेल्या अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ यांच्या ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ या सिनेमाची क्रेझ देशातच नाही तर परदेशातही पाहायला मिळत आहे. अक्षय-टायगरची फॅन फॉलोइंग देशातच नाही तर परदेशातही आहे, सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये अक्षय कुमार आणी टायगरचे इथिओपियन चाहते ‘बडे मियाँ छोटे मियाँ’च्या ‘मस्त मलंग’ गाण्यावर ग्रुप डान्स करताना दिसत आहेत. या व्हिडिओमध्ये सर्व चाहते चित्रपटाच्या गाण्यावर आनंदाने नाचत आहेत. अनेक चाहत्यांनी पांढरे टी-शर्ट घातले असून त्यावर अक्की लिहिलेले आहे. अनेक चाहत्यांनी ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ चित्रपटातील प्रिंट केलेले टी-शर्ट घातले आहेत, तर काही चाहते गाण्यावर अक्षय-टायगरच्या हुक स्टेप्स करताना दिसत आहेत.

🔥 सध्या व्हायरल 👉 मुलीने भर रस्त्यात केला माधुरी दीक्षितच्या गाण्यावर डान्स, व्हिडिओ व्हायरल.

🔥🔥 ट्रेंडिंग 👉 ‘पुष्पा 2’ टीझरला यूट्यूबवर मिळाले ‘इतक्या’ कोटींहून अधिक लाईक्स, 138 तासांनंतरही यूट्यूबवर ट्रेंडिंगमध्ये.

अक्षय कुमारच्या आगामी चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर अक्षय कुमार आपल्याला लवकरच ‘स्काय फोर्स’मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात अक्षय कुमार एअरफोर्स ऑफिसरच्या भूमिकेत दिसणार आहे. अक्षय कुमार व्यतिरिक्त या चित्रपटात वीर पहाडिया दिसणार आहे. अक्षयचा हा चित्रपट संदीप केवलानी आणि अभिषेक कपूर संयुक्तपणे दिग्दर्शित करणार आहेत. ‘स्काय फोर्स’ हा चित्रपट येत्या २ ऑक्टोबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

WhatsApp Group Join Now

व्हायरल वेब स्टोरीज

लेटेस्ट मनोरंजन विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

फॉलो करा 👇

Follow Karamnuk On Google News
लेटेस्ट मराठी मनोरंजन बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल न्यूज वर फॉलो करा.
Share This Article
कोण आहे Pushpa 2 मधील Kissik गाण्याने चर्चेत आलेली श्रीलीला Rashmika Mandanna: रश्मिका मंदानाचा गोंधळ, मागितली चाहत्यांची माफी पुष्पा 2 चा बॉक्स ऑफिसवर धमाका! 16 दिवसांत ‘इतके’ कोटीं? 18 ऑक्टोबर ला रिलीज होतोय प्रियांका चोप्रा चा मराठी चित्रपट करिना ला बनायच नव्हत अभिनेत्री, या प्रोफेशन मध्ये होता रस