बडे मियाँ छोटे मियाँ मधील अभिनेता टायगर श्रॉफने घेतले पुण्यात आलिशान घर, किंमत ऐकूनच व्हाल थक्क

2 Min Read
Bade Miyan Chote Miyan madil actor tiger shrof yane punyat alishan ghar kharedi kele

Bade Miyan Chote Miyan : बडे मियाँ छोटे मियाँ मधील अभिनेता टायगर श्रॉफ लवकरच आपल्याला मोठ्या पडद्यावर ॲक्शन करताना दिसणार आहे. येत्या ईदला बडे मियाँ छोटे मियाँ चित्रपट प्रदर्शित होणार आहे. दरम्यान, टायगर श्रॉफ बाबत एक बातमी समोर आले आहे. बडे मियाँ छोटे मियाँ रिलीज होत असतानाच नुकतेच टायगर श्रॉफने पुण्यामध्ये एक करोडो रुपयांचा आलिशान फ्लॅट खरेदी केला आहे.

मनी कंट्रोलच्या रिपोर्टनुसार, बडे मियाँ छोटे मियाँ मधील अभिनेता टायगर श्रॉफने पुण्यात एक आलिशान घर विकत घेतले आहे. टायगरने हे घर एक, दोन नव्हे तर 7.50 कोटी रुपयांना खरेदी केले आहे. टायगर श्रॉफचे पुण्यातील नवे घर 4248 स्क्वेअर फुटामध्ये वसलेल्या हाऊसिंग सोसायटीमध्ये आहे. मीडिया रिपोर्टनुसार, टायगर श्रॉफ हे घर भाड्याने देणार असून त्याला यातून दरमहा 3.50 लाख रुपये भाडे मिळेल. टायगर श्रॉफचा मुंबईतील खार भागात 8 BHK फ्लॅट आहे त्या फ्लॅटची किंमत 35 कोटी रुपये आहे.

टायगर श्रॉफ सध्या ‘बडे मियाँ छोटे मियाँ’च्या प्रमोशन मध्ये बिझी आहे, ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ 11 एप्रिलला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ मध्ये टायगर श्रॉफसोबत अक्षय कुमार हा देखील मुख्य भूमिकेत आहे. मानुषी छिल्लर, अलाया एफ आणि सोनाक्षी सिन्हा या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत. यांचबरोबर ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ मध्ये साऊथचा सुपरस्टार पृथ्वीराज सुकुमारनचाही समावेश आहे. ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ मध्ये पृथ्वीराज सुकुमारन याने खलनायकाची भूमिका साकारली आहे.

WhatsApp Group Join Now

व्हायरल वेब स्टोरीज

लेटेस्ट मनोरंजन विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

फॉलो करा 👇

Follow Karamnuk On Google News
लेटेस्ट मराठी मनोरंजन बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल न्यूज वर फॉलो करा.
Share This Article
कोण आहे Pushpa 2 मधील Kissik गाण्याने चर्चेत आलेली श्रीलीला Rashmika Mandanna: रश्मिका मंदानाचा गोंधळ, मागितली चाहत्यांची माफी पुष्पा 2 चा बॉक्स ऑफिसवर धमाका! 16 दिवसांत ‘इतके’ कोटीं? 18 ऑक्टोबर ला रिलीज होतोय प्रियांका चोप्रा चा मराठी चित्रपट करिना ला बनायच नव्हत अभिनेत्री, या प्रोफेशन मध्ये होता रस