Angelina Idnani अक्षय कुमार, सुनील शेट्टी आणि परेश रावल यांचा सुपर हिट चित्रपट ‘हेरा फेरी’ आणी त्याचा आलेला सिक्वेल ‘फिर हेरा फेरी’ हा देखील प्रेक्षकांना खूप आवडला होता. यात बिपाशा बसूच्या भाचीची भूमिका एका लहान मुलीने साकारली होती. ती मुलगी तुम्हाला आठवतेय का?
चष्मेश अंकल, चष्मेश अंकल, बोहोत भूक लगी है, एक केला दो ना. – हा तीच, ‘बाबू भैय्या’ कडे केला मागणारी ती गोंडस मुलगी 😜. आता ती मोठी झाली आहे आणी पूर्णपणे बदलली आहे. आता तिला पाहून ओळखणे फार कठीण आहे. तिने हेरा फेरी सोबत ता रा रम पम मध्येही काम केले आहे तिने त्यात सैफ अली खानच्या मुलीची भूमिका साकारली होती.
👉 काजोलची आई तनुजा आणि शोमू मुखर्जीच्या लग्नाचा फोटो व्हायरल, एकटीन सांभाळल….
तिचे नाव अँजेलिना इदनानी आहे. अँजेलिना आता 26 वर्षांची झाली आहे आणी ती सध्या दुबईत राहते. अँजेलिना सोशल मीडियापासून दूर राहते. तिचे इंस्टाग्राम खाते देखील खाजगी आहे. त्यामुळे लोक तिचे फोटो पाहू शकत नाहीत. पण अँजेलिनाचे चाहते तिचे नवीन फोटो शोधत असतात आणि ते तिच्या फॅन पेजवर शेअर करत असतात. अँजेलिना इदनानीचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
अँजेलिना सध्या अभिनयाच्या जगापासून दूर आहे. तिने फॅशन मार्केटिंगमध्ये डिप्लोमा केला आहे. फॅशन सेन्सच्या बाबतीत ती आजच्या अभिनेत्रींशी स्पर्धा करते. तिच्या फॅशन स्टाइलमुळे ती लोकप्रिय बनत आहे. तिचे सध्याचे फोटो पाहून तिला ओळखणे कठीण आहे
हेही वाचा 👉 Jawan: शाहरुख खानच्या ‘जवान’ चा दुसरा भाग बनणार? ॲटलीने केला खुलासा.